कृष्ण भेटलाच पाहिजे
*कृष्ण*
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला,
लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे...
लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज...अबोध नातं
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच
आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे....
"तो" कृष्ण "ती"ही असू शकते.
आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन रितं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा
कृष्ण भेटलाच पाहिजे........
आपल्या आजुबाजुला तो सापडेलच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलच असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे
सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा तो....
आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे.
खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती आश्वस्त *मैत्री* होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकू येत असावी रुंजणारी मुरली...
*अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे.*
*आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे......*
Labels: Lord Krishna
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home