Monday, July 20, 2020

सोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व



ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. अमावास्या प्रत्येक महिन्यात येते. पण, सोमवारी अमावस्या येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येते. म्हणून सोमवती अमावस्या खास आहे.

या दिवशी १०८ वेळा तुळशीची परिक्रमा करणे फायद्याचे ठरते. त्याचसोबत 'ॐकार मंत्रा'चा जप करणे, सूर्य नारायणाला अर्घ्य देणे या सर्व गोष्टी कराव्या. इतकं सर्व करणे जमणार नसेल तर फक्त तुळशीला १०८ वेळा प्रदक्षिणा घालणेही तुम्हाला लाभदायक ठरू शकते.

धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावास्या भाग्याची अमावास्या असल्याचे सांगितले आहे. या अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य आहे. नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते.  त्याचसोबत गोदान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले आहे.
सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे याला अधिक महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी महत्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळील कुंडात स्नान करावे आणि भगवान शिव, पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडवांच्या संपू्र्ण आयुष्यात एकदाही सोमवती अमावास्येचा योग आला नाही याची पांडवांना नेहमी खंत राहिली होती.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home