Wednesday, May 12, 2021

जानवे म्हणजे नेमके काय ?...

 जानवे म्हणजे नेमके काय ?...



◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो

◆दुसर्‍यावर अग्नी असतो

◆तिसर्‍यावर नवनाग असतो

◆चौथ्यावर सोम 

◆पाचव्यावर पितर

◆सहाव्यावर प्रजापती

◆सातव्यावर वायू

◆आठव्यावर सुर्यनारायण

◆नवव्यावर विश्वदेव


त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात

असे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो.


(जानवे ९६ बोटे लांब असते असा उल्लेख आहे यांत तुमच्या संमतीने थोडा बदल सूचवितो तो असा...

शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चार अंगुळे )लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते..यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू किंवा मुख्य धागा होय..! देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात....!

जानवे हे बेंबीपर्यंतच असावे..कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे...!

तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे..!तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरूषाचे प्रमाण  स्वत:च्या अंगुळांनी ८४ ते १०८ पर्यंत असते...त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते..खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते...३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते...!)


सविस्तर सांगावयाचे झाले तर 

( तंतू हाच शब्द बरोबर आहे. परंतु आपण काही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो ..!म्हणजे एका जानव्यात ९ तंतू ...तीन तंतूंचा एक पदर...याप्रमाणे एक जानवे तीन पदरी असते त्यास यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात..प्रेत्येक पदरास एक गाठ असते त्यास ग्रंथी म्हणतात....देवतान्यास करतांना ९+३ असे १२ मंत्र म्हणतात..!)


नंतर त्याची ●ब्रह्मगाठ● दिलेली असती हि अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्हा एकच आहे.


म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे.


● 4 वेद

● 6 शास्र

● अठरा पुराणे जिवो ब्रम्हैव ना पर हिच शिकवण देतात

● 15 कला

● 12 मास

● 7 वार

● 27 नक्षत्र



● प्रकृती

● पुरुष

● महतत्व

● अंहकार

● पंच महाभुते

● पंच विषय

● पंच ज्ञानेद्रिय

● पचं कर्मेद्रिय

● व मन


एकूण 25 आणि 4 वेद 3 काळ ( उन्हाळा हिवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम  हे तिन गुण मिळवून 96 होतात  म्हणून जानव्याला 96 बोटे लाबं दोरा असतो

माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात...


तो गुण नवरत्नाकारू !

यया नवरत्नाचा हारू !

न फेङितले दिनकरू !

प्रकाश जैसा !

शुभं भवतु


Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home