आषाढी एकादशी महत्व
आषाढी एकादशी महत्व :
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी.
आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि पूज्य मानली जाते.
या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात.
पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात, या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे आणि घराघरातील लहान ते मोठया वयातील व्यक्ती या आषाडी एकादशी चा उपवास करतात.
या आषाडी निमित्त महाराष्ट्रसह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जस कि पैठणहून एकनाथांची ची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची ची पालखी, देहूहून तुकारामांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची ची पालखी हि पंढरपुरास येत असते.
शेगाव या ठिकाणावरून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी हि पंढरपुरास रवाना होते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात, स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी या एकादशी स देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हंटले जाते.
आषाढी एकादशीचे महत्त्व (Importance of Ashadi Ekadashi)
आषाढी एकादशी म्हटलं तर लगेच टाळ, मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकीर पंढरपूरकडे जातानाचे दृष्य डोळ्यासमोर येते. विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात. या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला खूप महत्त्व असते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. आषाढीच्या एकादशीचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि ते वारी करून घरी परत जाईपर्यंत शेतातील माल वाढू लागलेला असतो.
देवशयनी एकादशीचे महत्त्व (Importance of Devashyani Ekadashi)
धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात. यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. अशी मान्यता आहे की या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी व्रत करणे आवश्यक असते. त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे.
Labels: Deities of India, General information
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home