सोमवती अमावस्या २०२०

 

२०२० च्या आषाढ महिन्यातील अमावास्येस एक विशेष महत्व आहे. ह्या वर्षी हि अमावास्या सोमवारी येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावास्येस सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. यंदा ती दि. २० जुलै रोजी येत आहे. ह्या नंतर दि. १४ डिसेंबर रोजी पुन्हा सोमवती अमावास्या येईल. सोमवती अमावास्येच्या दिवशी शिव पूजना व्यक्तिरिक्त पितरां प्रीत्यर्थ दान करण्यास विशेष महत्व आहे. 


सोमवती अमावास्येचे विशेष महत्व 

प्रत्येक हिंदू महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीस म्हणजेच त्या महिन्यातील तिसाव्या तिथीस अमावास्या असते. अमावास्येचे एक महत्व असतेच, परंतु त्यात सुद्धा जर ती सोमवारी आली तर त्यास अधिक महत्व प्राप्त होते. ह्या दिवशी पितृ तर्पणा खेरीज स्नान, दान इत्यादी कार्ये करण्याचा मुहूर्त शुभ असतो. सोमवती अमावास्या पितृ तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी कार्यांसाठी श्रेष्ठ तिथी असल्याचे मानण्यात येते. ह्या दिवशी पितृ दोष व कालसर्प दोष ह्यापासून मुक्त होण्यासाठी उपवास व पूजा सुद्धा करण्यात येते. 

सोमवती अमावास्येने दूर होतात अशुभ योग 

कोणत्याही महिन्याच्या सोमवारी येणाऱ्या अमावास्येस सोमवती अमावास्या ह्या नावाने संबोधले जाते. ह्या दिवशी विशेषतः पूर्वजांचे तर्पण करण्यात येते. ह्या दिवशी उपवास करून पिंपळाच्या झाडाखाली बसून शनी मंत्राचा जप करावा व पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालाव्यात. ह्या व्यतिरिक्त भगवान श्रीविष्णू व पिंपळाच्या वृक्षाचे पूजन सुद्धा करावे. असे केल्याने शनीच्या साडेसातीचा किंवा दशेचा अशुभ प्रभाव दूर होतो.      ह्या दिवशी भगवान श्रीशंकरास रुद्राभिषेक केल्याने विशेष फलप्राप्ती होते. महिला आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. 

सोमवती अमावास्येचे उपाय 

- सोमवती अमावास्येस तुळशीला १०८ वेळा प्रदक्षिणा घातल्याने दरिद्रता दूर होते. 
- ह्या नंतर यथाशक्ती दान करण्यात येते. 
- सोमवती अमावास्येच्या दिवशी स्नान व दान ह्यांचे विशेष महत्व आहे. 
- एक अशी मान्यता आहे कि सोमवती अमावास्येच्या दिवशी मौन व्रत धारण करून स्नान व दान केल्यास हजार गायी दान करण्या इतके फळ मिळते. 

सोमवती अमावास्या 

अमावास्या प्रारंभ - दि. २० जुलै २०२० रोजी ००.१० मिनिटांनी. 
अमावास्या समाप्ती - दि. २० जुलै २०२० रोजी २३.०२ मिनिटांनी. 

अमावास्या प्रारंभ - दि. १४ डिसेंबर २०२० रोजी ०.४४ मिनिटांनी. 
अमावास्या समाप्ती - दि. १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९.४६ मिनिटांनी. 


ह्या वर्षी करा विशेष पूजा 

- शिवलिंगावर बिल्वपत्र वाहून "ॐ नमः शिवाय" ह्या मंत्राचा जप करावा. 
- भगवान श्रीशंकरास रुद्राभिषेक करावा. 
- पितरांना तर्पण करावे. 
- गरिबास धन व अन्न दान करावे. 
- पिंपळाच्या झाडा जवळ दीपक प्रज्वलित करावा.

Comments